Ahir Suvarnakar Mandal, Shahada Dist- Nandurbar (Maha)

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा जि. नंदुरबार आपले हार्दिक स्वागत करीत आहे


माता बिजासनी मंदिर सेंधवा

खान्देश! आभीर उर्फ अहिरांचा प्रदेश! सूर्यकन्या तापी , गिरणा , गोदावरीची सुपीक भूमी , चांगदेवादी संतांची भूमी , खान्देश कन्या बहिणाबाई , तर्कातीर्थ लक्ष्मण शास्त्रीची भूमी. मातृहृदयी साने गुरुजी , केशवसुत नवकाव्याचे जनक बा.सी.मर्ढेकरांची कर्मभूमी!

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव , धुळे , आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा (२३ तालुक्यांचा) प्रदेश आज खान्देश म्हणून ओळखला जातो. प्राचीनकाळी नाशिक हा प्रदेशही खान्देशातच गणला जाई. खान्देशचा आती प्राचीन , प्राचीन , मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी संस्कृतिक परंपरा आहे. ‘ आभीर देश , अहिराष्ट्र , कान्हदेश , कानदेश , खानदेश ’ अशी या प्रदेशाची भली मोठी नामावली मिळते.

श्रीकृष्णाचे बालरूप अर्थात ‘ कान्हा ’ याचा तो ‘ कान्हदेश ’ आणि त्याचाच अपभ्रंष ‘ खान्देश ’ असल्याचे मानले जाते. काहींच्या मते कानबाई हे खास खान्देशचेच दैवत असल्याने कानबाईचा तो कानदेश आणि त्याचाच अपभ्रंष ‘ खान्देश ’ असावा. आभीर या शब्दाचाच अपभ्रंश अहिर असून या प्रदेशाला अभिर प्रदेश ’ देखील संबोधले जाते.

» Read more

अहिर सुवर्णकार मंडळ, शहादा - वाटचाल


श्री. जीवन दत्तात्रय जगदाळे
अध्यक्ष

परिसरातील अहिर सुवर्णकार बांधवांनी सामाजिक एक्य , एकमेकांचे सुख:दुखातही संवेदनशीलता, सौजन्य आदि बाबींचा वसा-वारसा पूर्वापार जपला आहे. देशसेवा व देशासाठी त्याग करण्याठी इथला अहिर सोनार मागे नाही. कै.रतन पांडुशेठ सोनार , कै.मंगू ताणजीशेठ सोनार , कै.गोपाळ तानाजीशेठ सोनार आदि स्वतंत्र सेनानिंचा या परिसरात एक उज्वल व समाजासाठी अभिमानास्पद इतिहास आहे.

आज लग्न , उत्तरकार्यादी कार्यक्रमासाठी विविध वस्तुरूप साधनांसह आणि मनुष्यबळासह ठेकेदारी सेवा उपलब्ध आहेत. पूर्वी या गोष्टींचा अभाव असताना समाजबांधवच एकमेकांच्या हाती हात घेवून रूसवे-फुगवे विसरून एकमेकांना साथ देत. काही अत्यावश्यक साधंनांचा उणिवा ध्यानी घेवून सामुदायिक वर्गणीतून अनेक समारंभाना लागणार्‍या वस्तु (भांडी , सतरंज्या आदि) सामूहिक वर्गणीतून उपलब्ध करून घेत. कुणाच्या मरनादी संकटात सर्वांनी धावून जाने , सामूहिक श्रद्धांजलि वाहने ही संवेदनशीलता कायम जपली आहे. प्रत्येकजन समाजासाठी आपापल्या यथाशक्तीने योगदान देत आला. कुणी वेळेचे , कुणी श्रमाचे , तर कुणी कमी अधिक आर्थिक योगदान दिले आहे. व देत आहे.

» Read more

Photo Gallery

कुलदैवत

विंदयावासीनी
देवी
म्हाळसा
देवी
धंनाई पुनाई
देवी

Contact Us

अहिर सुवर्णकार मंडळ , शहादा जि. नंदुरबार 425409 महाराष्ट्र

पत्ता : पोस्ट ऑफिस समोर , शहा दा
मोबाइल नंबर : +9423493101

Others: 02565 223106
E-mail: mitshahada@gmail.com